मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर यांच्या हायकर्टाने दिलेल्या निकालावर विचारले असता ते म्हणाले, भाजप नेत्यांनाच न्यायालयात दिलासा कसा मिळतो तो एक आश्चर्याचाच प्रश्न असल्याचे गृहमंत्री म्हणाले. एका विशिष्ट पक्षांच्याच लोकांना दिलासा मिळायला लागला बाकीच्या पक्षांच्या लोकांचा विचार समोर येतात. असा सहजपणे कोणाच्या मनात असा प्रश्न येईल, त्याच्यात काही चूकीचं नाही’ असे राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.
पुढे वळसे पाटील म्हणाले की, नवाब मलिक यांचा संबंधी दाऊदशी जोडला जातो, ही काही नवीन बाब नाही. या आधी देखील असे प्रयत्न वेळा झाले आहेत. नवाब मलिकांची केस खूप जुनी केस आहे. दाऊदशी संबंध नसताना ओढून ताणून संबंध जोडायचा, शरद पवार यांचा संबंध नसताना देखील त्यांचा जोडण्याचा प्रयत्न भाजपाने केला होता, त्यामुळे मला त्यात काही तथ्य दिसत नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांना जाणून बुजून आडचणीत आणायचे आणि आपले राजकारण साधायचे हि भाजपची सवयच आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर ३७० कलम याविषयी १४ ट्विट करत टिका केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीची ३७० कलम याविषयी भूमिका स्पष्ट असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमिवर राज्याचे गृहमंत्री पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.