नाशिक | Nashik News – 17 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, नर्सिंग शाखेच्या सिनेट सदस्य, अधिसभा मंडळ, अभ्यास मंडळाच्या निवडणुका संपन्न झाल्या. होमिओपॅथी विभागातून महाराष्ट्र होमिओपॅथिक कॉलेज फेडरेशन प्रणित होमिओपॅथी विकास आघाडीने 13 जागा जिंकत घवघवीत यश संपादन केलेलं आहे.
प्राचार्य गटातून अधिसभा मंडळावर छत्रपती संभाजीनगरच्या फोस्टर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अनुपमा पात्रीकर या विजयी झाल्या आहेत. तर सिनेट सदस्य प्रोफेसर गटातून छत्रपती संभाजीनगर विभागातून शिवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शिवाजीराव पवार ,मुंबई विभागातून डॉ. राजेश चंद्रकांत डेरे ,पुणे विभागातून सोलापूरचे डॉ. सायबू लक्ष्मण गायकवाड तर नागपूर विभागातून डॉ. अभय दातारकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
अभ्यास मंडळाच्या प्री क्लीनिकल विभागातून गुरू मिस्त्री होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जालनाचे डॉ. शिवाजी बनसोडे, माऊली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज उदगीर, लातूरचे डॉ.रत्नेश्वर धानोरे, श्री भगवान होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, छत्रपती संभाजीनगरचे डॉ. वंदना सागा विजय झाल्या असून पॅराक्लीनिकल अभ्यास मंडळातून मिरजचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष कै.डॉ.लक्ष्मणराव भोसले यांचे चिरंजीव गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सांगलीचे डॉ.प्रताप भोसले, श्री भगवान होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगरचे डॉ. सीताराम डोळे तर क्लीनिकल विभागातून गुरू मिस्त्री होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, जालन्याच्या डॉ.कांचन देसरडा, पंचशिल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज खामगावचे डॉ. अजय काळे, फॉस्टर डेव्हलपमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, छत्रपती संभाजीनगरचे डॉ. सूर्यकांत गीते हे विजयी झाले आहेत.
होमिओपॅथिक विकास आघाडीचे तेरा उमेदवार या निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत. या निवडणुका महाराष्ट्र होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज फेडरेशनचे अध्यक्ष आमदार विक्रम काळे ,सचिव पृथ्वीराज पाटील सेक्रेटरी डॉ.अरुण भस्मे ,डॉ.वीरेंद्र कवीश्वर खामगाव ,डॉ. जी डी पोळ नवी मुंबई, डॉ.राजेंद्र खेडेकर छत्रपती संभाजीनगर, डॉ.बाळासाहेब पवार छत्रपती संभाजीनगर,डॉ. फारूख मोतीवाला नाशिक, डॉ.अरविंद गवळी सातारा, डॉ.कांचन देसरडा जालना, डॉ.पी.वाय कुलकर्णी छत्रपती संभाजीनगर ,डॉ.किशोर मालोकार अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली लढवण्यात आले असून सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीशजी महाजन, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे मा.उपाध्यक्ष डॉ बाळकृष्ण गायकवाड, हिम्पमचे डॉ. प्रतिक तांबे यांनी केले. होमिओपॅथीच्या विकासासाठी होमिओपॅथिक विकास आघाडी ही कटिबद्ध असून येणाऱ्या काळामध्ये होमिओपॅथीच्या विकासासाठी काम करणार असल्याचे सर्व निवडून आलेल्या सदस्यांनी यावेळी सांगितले. या निवडीबद्दल होमिओपॅथिक विकास आघाडीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.