मुंबई | Honey Singh – सध्या प्रसिद्ध रॅपर हनी सिंग (Rapper Honey Singh) चांगलाच चर्चेत आहे. लवकरच हनी सिंगचा नवीन म्युझिक अल्बम 3.0 प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या अल्बमचं प्रमोशन करण्यामध्ये हनी सिंग सध्या व्यस्त आहे. तसंच हनी सिंगने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या डिप्रेशनबद्दल खुलासा केला आहे. यावेळी त्यानं अभिनेता अक्षय कुमारबाबतही (Akshay Kumar) भाष्य केलं आहे.
हनी सिंग म्हणाला की, ज्यावेळी मी डिप्रेशनमध्ये होतो, त्यावेळी मला कोणासोबतही फोनवर बोलू वाटत नव्हतं. मी तब्बल सात वर्ष फोन वापरणं बंद केलं होतं. तेव्हा अक्षय कुमारला माझ्या तब्येतीबद्दल समजलं अन् त्यानं मला फोन केला. अक्षय कुमार मला सतत फोन करत होता. पण त्यावेळी मला कोणाशीच बोलण्याची इच्छा नव्हती.
तेव्हा माझ्या आईनं मला सांगितलं, अक्षय पाजीचा फोन आला आहे, तू एकदा बोलून घे नाहीतर ते ऐकणार नाहीत. मग शेवटी मी अक्षयचा फोन उचलला. त्यानं मला काळजी घेण्याचा सल्ला दिला. सोबतच साऊथमध्ये जाऊन उपचार घेण्याचाही सल्ला दिला होता. माझ्या वाईट काळामध्ये अक्षय कुमारसोबत अनेक कलाकारांनी माझी मदत केली.