नाशिकमध्ये कार-कंटेनरचा भीषण अपघात, धुळ्याच्या नगरसेवकासह तीन जणांचा मृत्यू

नाशिक | Nashik Accident – नाशिकमध्ये (Nashik) कार आणि कंटेनरचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. नाशिकमधील चांदवडजवळ कार-कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये धुळ्याच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. तसंच अन्य तीन मृत प्रवासी देखील धुळ्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

हा भीषण अपघात चांदवडजवळील नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई-आग्रा महामार्गावर झाला आहे. चार प्रवाशी कारमधून नाशिकहून धुळ्याकडे चालले होते. यादरम्यान सकाळी सातच्या सुमारास चांदवडजवळ कार आणि कंटेनरची जोरदार धडक झाली. यामध्ये कारमधील चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघातात मृत पावलेल्यांमध्ये धुळ्यातील नगरसेवक किरण अहिरराव यांचा समावेश आहे. तर अद्याप इतर मृतांची ओळख होऊ शकलेली नाहीये. या भीषण अपघातानंतर पोलीस आणि सोमा टेल वेज कंपनीचे पथक घटानस्थळी दाखल झाले आहे. तर या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता.

Sumitra nalawade: