आजकाल प्रेक्षकांना सस्पेन्स थ्रीलर, अॅक्शन, ड्रामा, हॉरर अशा अनेक विषयांवर आधारित चित्रपट पाहायला आवडतात. यासोबत प्रेक्षकांनी झॉम्बीवर आधारित चित्रपटांना मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. झॉम्बीवर आधारित चित्रपट म्हणजे मनोरंजनाचा एक उत्कृष्ट असा डोसच. या शैलीतील चित्रपट पाहायला प्रेक्षकांना मनापासून आवडते. या चित्रपटांचे अनेक लोक चाहतेही आहेत. असे चित्रपट पाहण्यासाठी बहुतेक लोक आतुर असतात. तर आता आपण काही अशा झॉम्बी (Zombie) चित्रपटांबाबत जाणून घेणार आहोत जे सुरहिट ठरले आहे. हे चित्रपट म्हणजे झॉम्बी चित्रपटाच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाची एक मेजवानीच ठरेल.
झॉम्बी प्रकार आहे तरी काय?
झॉम्बी चित्रपटांबाबत जाणून घेण्याअगोदर हा झॉम्बी प्रकार आहे तरी काय? याबाबत जाणून घेणार आहोत. कारण सगळ्यांच झॉम्बीबाबत माहिती नाहीय, बहुतेक लोकांनाच याबाबत माहिती आहे. तर झॉम्बी हे एक काल्पनिक असं पात्र आहे. वास्तवात हा प्रकार अस्तित्वात नाहीये. झोम्बीचा हा प्रकार कल्पनारम्य, भयपट लिखाणात आढळून येतो. तसंच झॉम्बी म्हणजे लोकांना खाणारे मृत आणि क्रूर काल्पनिक मानवी देह असतात. चला तर मग याच काल्पनिक झॉम्बी चित्रपटांबाबत जाणून घेऊया.
1. ओवरलोर्ड (Overlord) – झॉम्बी चित्रपट प्रेमींसाठी ‘ओवरलोर्ड’ हा चित्रपट एक उत्तम पर्याय आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरची काल्पनिक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. झॉम्बीवर आधारित हा चित्रपट पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ज्युलियस एव्हरीचा हा चित्रपट तुम्हीही एकदा नक्की पहा.
2. वर्ल्ड वार जेड (World War Z) – ‘वर्ल्ड वार जेड’ हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला आहे. ब्रॅड पिटचा हा चित्रपट झॉम्बी चित्रपटाच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाचा एक उत्तम पर्याय आहे. या चित्रपटात धोकादायक विषाणूनं माणसांचे झॉम्बीमध्ये रूपांतर झाल्याची कथा दाखवण्यात आली आहे. हा एक भितीदायक, मनोरंजनात्मक असा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षक आजही तितक्याच आवडीने पाहतात.
3. शॉन ऑफ द डेड (Shaun of the Dead) – ‘शॉन ऑफ द डेड’ हा झॉम्बी वर अधारित चित्रपट खूपच खतरनाक आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमचा थरकाप नक्कीच उडेल. या चित्रपटात एका सेल्समनची कथा दाखवण्याती आली आहे, ज्याला झॉम्बींचा सामना करावा लागतो. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.
4. आर्मी ऑफ द डेड (Army of the Dead) – ‘आर्मी ऑफ द डेड’ हा चित्रपट देखील चांगलाच गाजला आहे. या चित्रपटात खतरनाक अॅक्शनसोबत कॉमेडीचीही भर घालण्यात आली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांचं मोठ्या प्रमाणात मनोरंजन झालं आहे. झॉम्बी चित्रपट चाहत्यांसाठी हा चित्रपट एक उत्तम पर्याय आहे. तुम्हीही हा चित्रपट नक्की पाहा, विशेष म्हणजे हा चित्रपट ओटीटीवर नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.