मुंबई | Swara Bhasker – सध्या बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) चांगलीच चर्चेत आहे. स्वरानं फहाद अहमदशी (Fahad Ahmad) लग्नगाठ बांधली आहे. तसंच नुकतंच त्यांचं बरेली येथे रिसेप्शन पार पडलं. या रिसेप्शनमध्ये स्वरा पाकिस्तानी लूकमध्ये दिसली. स्वरानं रिसेप्शनमध्ये पाकिस्तानातून आणलेला लेहेंगा परिधान केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या लेहेंग्याची चांगलीच चर्चा सुरू होती. तसंच आता हा लेहेंगा पाकिस्तानातून भारतात आला कसा? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याबाबत स्वरानं स्वत: पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
स्वरानं एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तिनं रिसेप्शनचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिनं सांगितलं की, हा पाकिस्तानी लेहेंगा लाहोरवरून दुबईला पोहोचला. त्यानंतर दुबईहून मुंबईत आणि मुंबईतून तो बरेलीत आणण्यात आला. तसंच तिनं यासाठी AliXeeshanTheatreStudio चे आभार मानले.
दरम्यान, बरेलीतील ‘द ग्रँड निर्वाणा रिसॉर्ट’मध्ये स्वरा-फहादनं रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. तसंच आता स्वराच्या पाकिस्तानी लूकची चांगलीच चर्चा होत आहे. रिसेप्शमध्ये स्वरानं पाकिस्तानी डिझायनरचा क्रीम रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर फहादनं पांढरी शेरवानी आणि पांढरा- सोनेरी दुपट्टा असलेला सोनेरी रंगाचा कुर्ता घातला होता.