‘टाईमपास 3’ नंतर ऋता दुर्गुळे ‘या’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई | Hruta Durgule New Movie – अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. ऋता ‘फुलपाखरू’ या मालिकेतून चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. तसंच ऋताचा नुकताच वाढदिवस झाला असून तिला वाढदिवसाच्या दिवशी एक खास गिफ्ट मिळालं आहे. ऋताने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

ऋता लवकरच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यासंदर्भात ऋतानं एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचं पोस्टर शेअर करत म्हटलं आहे की, “मोठ्या पडद्यावरील पुढील उपक्रमाची घोषणा करत आहे. उंच आकाशात उडायचं तर हवी मैत्रीची, प्रेमाची, जिद्दीची कन्नी”, असं कॅप्शन तिनं पोस्टला दिलं आहे. पुढे तिने “यापेक्षा छान गिफ्ट काय असू शकतं” असं म्हणत चित्रपटाच्या टीमचे आभार मानले आहेत. तसंच ऋताच्या नवीन चित्रपटाचं ‘कन्नी’ असं नाव आहे. 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, ‘कन्नी’ या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांची जोडी पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. याअगोदर ते दोघं ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत एकत्र दिसले होते. तसंच कन्नी चित्रपटात ऋता आणि अजिंक्य सोबत अभिनेता अमित भरगड, शुभांकर तावडे, ऋषी मनोहर, अभिनेत्री वल्लरी विराज हे कलाकारही झळकणार आहेत.

Sumitra nalawade: