पिंपरी : पुणे जिल्हा वेटलिफ्टींग संघटनेचे चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भव्य वेटलिफ्टींग स्पर्धेला खेळाडूंचा मोठा प्रतिसाद मिळाला. १२२ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. राष्ट्रीय खेळाडू देखील सहभागी झाले होते. .
या स्पर्धा चार वयोगटात पार पडल्या. चारही गटातील पहिल्या तीन विजेत्यांना ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. इंद्रायणी महाविद्यालयातील हॉलमध्ये शनिवारी आणि रविवारी दोन दिवस सकाळी १० ते ६ या वेळेत ही स्पर्धा पार पडली. माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते.
माजी नगरसेविका शैलजा काळोखे, पुणे जिल्हा वेटलिफ्टींग संघटनेच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, उपाध्यक्ष रविंद्र यादव, सचिव सुधीर म्हाळसकर, खजिनदार आनंदराव जांभूळकर, संतोष मोरे आदी उपस्थित होते. १२, १४, १७ युथ, २० ज्युनिअर अशा चार वयोगटात ही स्पर्धा झाली.