लेखनातून जपली ग्रामीण जीवनाशी माणुसकी

ज्येष्ठ साहित्यिक सुमती पवार यांच्या हस्ते

दोन्ही पुस्तके सर्वार्थाने समाजोपयोगी…
साहित्यिक व कवी विवेक उगलमुगले सर पुस्तकातील लेखांसंबंधी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, अलकाताईंच्या लेखनात संस्कृतीच्या पाऊलखुणा दिसतात व ग्रामीण जीवनाशी जपलेली माणुसकीही दिसते. पारंपरिकतेबरोबरच आधुनिकतेचाही सुरेख संगम वाचण्यास मिळतो. लेखिकेचे सुसंस्कृत मन वाचकाला भावनेशी जोडताना दिसते. अर्थपूर्ण जगण्याचे सामर्थ्य हेही त्यांच्या लेखनाचे ठळक वैशिष्ठ्य म्हणता येईल. दोन्ही पुस्तके मराठी साहित्यात उच्च प्रतीची ठरतील, इतके त्यातील लिखाण सजीव आहे.

पुणे : अलका दराडेलिखित जीवनातील साखरपेरणी व पर्यटनाच्या अनोख्या जगात या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक सुमती पवार व दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.


भारतीय संस्कृती देशातील नैसर्गिक सौदर्य, कला, भाषा, इतिहास याचा सुरेख संगम पर्यटनाच्या अनोख्या जगात या पुस्तकात वर्णन केले आहे. या पुस्तकात पर्यटन करणार्‍या पर्यटकांसाठी पर्यटनाच्या अनोख्या जगात या पुस्तकातील अनुभव संपन्न लेख खास मार्गदर्शक व वाचनीय आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन वैशाली पब्लिकेशन यांनी केले आहे. या दोन्ही पुस्तकांसाठी रवींद्र मालुंजकर व वेदश्री थिगळे यांची प्रस्तावना आहे.


ज्येष्ठ साहित्यिक सुमती पवार म्हणाल्या, की अलकाताई मला प्रकाश देणार्‍या नंदादीपाप्रमाणे वाटतात. त्यांच्या पर्यटन व लेखांवरील अंतर्बाह्य देखावा पुस्तकाने मला खिळवून ठेवले. दोन्ही पुस्तकातील ज्ञान, माहिती व विषयातील विविधता लक्षणीय आहे. मोनालिसापासून पुण्यनगरी नाशिकपर्यंत माहिती देऊन त्यांनी आश्चर्यचकित केले आहे. निरीक्षणाच्या ताकदीने या पुस्तकांनी साहित्यक्षेत्रात मोलाची भर घातली आहे. कोणत्याही गोष्टीचा हव्यास नसला, की जीवन सार्थकी लागते. हे त्यांचे जीवनसूत्र त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिली आहे. प्रत्येक विषयाचे ह्यांनी सोने केले आहे. त्यांच्या विचार व आचरणावरून त्याच्यासाठी ‘ऋषितुल्य’ हा शब्द वापरावा लागतो. त्यांच्या सोज्वळ व्यक्तिमत्त्वाने लाख मोलाची पुस्तक त्यांनी आपल्यासमोर आदराने ठेवली आहेत.


अलकाताई म्हणाल्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या विशाल दृष्टिकोनातून मी दोन्ही पुस्तके लिहिली आहेत. सहलीतील समृद्ध क्षण टिपले आहेत. पर्यटनामागे वडिलांची आशीर्वादरूपी प्रेरणा आहे. राष्ट्रभक्तीचे स्मारक अंदमान पाहताना नैसर्गिक सौंदर्याने नटलेले कोकणच मला वाटले. माझ्या प्रामाणिक विचारात पारदर्शकताही आहे.


जीवनात आनंदाश्रू व दुःख या दोघांबरोबरच आपण जगत असतो. अनेक प्रसंगांवर हळुवार फुंकर घालून आप्तस्वकीयांबरोबर आनंदाने चालत राहणे म्हणजे जीवनातील साखरपेरणी होय. माझे पंचवीस लेख माझ्या अनुभवांचे साक्षीदार आहेत.
वैशाली प्रकाशनचे प्रकाशक विलास पोतदार म्हणाले की, अलकाताईंची दोन्ही पुस्तके सर्वार्थाने समाजोपयोगी आहेत. त्यांचे ललित लेख अभ्यासपूर्वक डोळसपणाने लिहिले आहेत. त्यामुळे त्यात जिवंतपणा जाणवतो.

Sumitra nalawade: