बायकोनं दिलेल्या ‘गुलीगत’ धोक्यानंतर नवरोबा बसला थेट उपोषणाला

बुलडाणा | Husband Wife Argument | आजकाल आपण नवरा बायकोचं भांडण किंवा नवऱ्याने केला बायकोचा (Husband And Wife Argument) छळ अशा अनेक गोष्टी ऐकतो. मात्र बुलडाणा जिल्ह्यात याउलट एक प्रकार घडला आहे. एका नवऱ्याने चक्क त्याच्या बायकोच्या विरोधात उपोषण (Strike) सुरू केलं आहे. Husband Wife Argument

नवरा बोयकोचं भांडण आणि नवरा थेट बायकोच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात घडला आहे. शहरातील राजनगर येथे राहणाऱ्या नवऱ्याने पत्नीने घटस्फोट (Divorce) न घेता दुसरं लग्न (Second Marriage) केलं म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले. मात्र त्यांना पोलिसांकडून कोणतीही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी चक्क उपोषण केलं आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी लवकरात लवकर पत्नीवर गुन्हा दाखल करावा आणि कारवाई करावी अशी मागणी पतीने केली आहे. तसंच त्यांनी नांदुरा येथील तहसील कार्यालयासमोर २६ मे पासून आपला तंबू ठोकला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सगळीकडे यासंदर्भात चर्चा सुरू आहे.

Sumitra nalawade: