‘मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की…’- नवनीत राणा

मुंबई : खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान दिलं आहे. “मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये यावं आणि लोकांमधून निवडून येऊन दाखवा,” असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात उभे राहतील तेथे मी उभी राहून जिंकून दाखवेल, असंही म्हटलं आहे.

यावेळी नवनीत राणा म्हणाल्या, “मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये यावं आणि लोकांमधून निवडून येऊन दाखवा. त्यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील मतदारसंघ निवडावा, मी त्यांच्याविरोधात उभी राहील आणि निवडून येऊन दाखवू. तेव्हा त्यांना जनतेची ताकद काय असते हे कळेल.”

“दोन पिढ्यांपासून मुंबई महानगरपालिका यांच्याकडे आहे. मात्र, येणाऱ्या काळात मुंबईची जनता आणि रामभक्त त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. मी पूर्ण ताकदीने मुंबई पालिका निवडणुकीत उतरेल. शिवसेनेने मुंबई पालिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची लंका तयार केली आहे. ती लंका आम्ही नष्ट करू,” असं म्हणत नवनीत राणा यांनी शिवसेनेला आव्हान दिलं आहे.

Sumitra nalawade: