मुंबई | अभिनेत्री दिशा पटानी ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर चांगलची सक्रीय असते. तसंच दिशा लवकरच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये दिशा व्यतिरिक्त जाॅन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झालेला एक व्हिलनचा रिमेक आहे. तसंच सध्या दिशा पटानी ही एक व्हिलन रिटर्न्स चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत दिशा म्हणाली होती, की ती आपला चित्रपट पाहात नाही. स्वतःला पाहणं आवडत नसल्याचं ती म्हणाली.
यावेळी दिशा पटानी म्हणाली, मला स्वत:ला पाहणे आवडत नाही. मी स्वत:ला पाहू शकत नाही. वास्तविक मला स्वत:ला पाहणं आवडत नाही. कारण मला चांगलं वाटत नाही. जेव्हा कधी मी माझे चित्रपट पाहते, त्यावेळेस अर्धा चित्रपट होईपर्यंत डोळे हाताने बंद करून ठेवते”.
दरम्यान, दिशाने बाॅलीवूडमध्ये ‘एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ यातून पदार्पण केलं आहे. यात दिशाबरोबर सुशांत राजपूत मुख्य भूमिकेत होता. यापूर्वी ती तेलगू चित्रपट लोफरमध्ये दिसली होती. त्यानंतर दिशाने बागी 2, भारत, मलंग, बागी 3 आणि राधे यात काम केलं आहे.