मुंबई : (Sudhir Mungantiwar On Conference Coir Committee) बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. मात्र, यावर भाजप बघ्याची भुमिका घेताना दिसत आहे. आमचा या बंडाशी काहीही संबंध नाही असे भाजप नेत्याकडून सांगण्यात येत आहे. परंतू शिंदे यांच्या भाजप यांच्यात भेटीगाठी वाढल्या आहेत. शिवसेना आणि बंडखोर यांच्यातील वाद आता न्यायालयात गेला आहे. न्यायालयाने १२ जुलै पर्यंत बंडखोर आमदारांवर निलबंनाची कारवाई करता येणार नाही असे सांगितले आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची सोमवार दि. २७ रोजी बैठक पार पडली या बैठकीत शिवसेनेत पडलेल्या फूटीबाबात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बैठकीत मंथन झाले. या बैठकीत भाजपच्या भविष्यातील भूमिकेबाबात चर्चा झाल्याचे देखील सुधिर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. भाजपची सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थीतीवर भाजपच बारीक लक्ष असून योग्य वेळी योग्य भूमिका घेतली जाईल यासोबतच भाजपकडे प्रस्ताव आल्यास विचार करून निर्णय घेणार असल्याचेही मुनगंटीवार यावेळी सांगितले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात भाजप सत्तास्थापन करणार अशी चर्चा होत आहे. पण, भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सरकार स्थापनेबाबत बैठकीत कोणतीही चर्चा नाही. बंडखोर स्वतःला शिवसैनिक मानत आहेत, मग बंडखोर कोण हे येणाऱ्या काळात कळेल, मी सेनेच्या कुठल्याही आमदाराला बंडखोर मानत नाही, शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या ५५ आमदार आहेत त्यापैकी ४० पेक्षा जास्त आमदार आहेत, मग त्यांना बंडखोर कसं म्हणणार असेही मुनगंटीवार म्हणाले.