मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी एकत्र चित्रपट केले आहेत. मग तो त्यांचा ‘ बँड बाजा बरात’ हा चित्रपट देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरणारा चित्रपट ठरला आहे. त्या चित्रपटातील त्या दोघांची केमेस्ट्री सर्वांच लक्ष वेधून घेणारी आहे. कमी काळात या दोन्ही सेलिब्रेटींनी आपल्या अभिनयाने बॉलीवूडमध्ये स्थान निर्माण केलं आहे. या दोघांच्या या चित्रपटानंतर आता पुन्हा अभिनेता रणवीर सिंगनं एका मुलाखतीमध्ये अनुष्का शर्मा विषयी दिलेली प्रतिक्रिया चांगली चर्चेत आली आहे.
रणवीर सिंग याने सांगितल की, बँड बाजा बरात हा चित्रपटाने चांगलचं यश मिळवल आहे. अनुष्का तर आता बॉलीवूडमधील उत्तम अभिनय करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. रणवीर सिंगने सांगितले तिच्याबाबत बोल्ड सीन करताना मला आवडेल. कारण बँड बाजा बरातमध्ये त्यांचा आणि अनुष्काचा एक बोल्ड सीन होता, तो बराचसा चर्चेतही होता. तेव्हापासून रणवीरला नेहमीच अनुष्काचा एक अभिनेत्री म्हणून अभिमान वाटत आला आहे. ती प्रभावी अभिनेत्री आहे. तिला अभिनयाची चांगली समज आहे. तिच्यासोबत कोणताही प्रोजेक्ट करत असताना खूप काही शिकायला मिळते असं रणवीर म्हणतो.
दरम्यान, तो सांगतो की, जर मला पुन्हा तिच्यासोबत इंटिमेट सीन करण्याची भूमिका मिळालीच तर मी ती पुन्हा एकदा करायला तयार आहे. कारण त्या अभिनेत्रीचा सर्पोटिव्हनेस चांगला आहे. तसचं अनुष्काला आपला अभिनय आणि कोणत्या वेळी कसा सीन करायचा हे चांगलचं माहित आहे. ती एक कलाकार म्हणून भूमिका योग्य पद्धतीने जपते. त्याचबरोबर आमच्या दोघांनाही ‘बँड बाजा बरात’ मधून करिअरला वेगळं वळण मिळालं आहे. असंही रणवीर सांगतो.