भारतात येण्याआधीच पाकिस्तानला धडकी! त्यामुळे पाकिस्तानी संघासोबत मानसशास्त्रज्ञ?

ICC Men’s ODI World Cup 2023 : ऑक्टोबर 2023 पासून भारतात सुरु होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभुमीवर जगभरातील सर्व संघ व्यस्त आहेत. विश्वचषकाच्या महाकुंभात जगभरातून 10 संघ सहभागी होणार आहेत. मात्र, दुसरीकडे पाकिस्तानचा संघ भारतात येणार की नाही, हा चेंडू तेथील सरकारच्या हातात आहे. यावर तळ्यात-पळ्यात अशी स्थिती सरकारची दिसून येत आहे. मात्र, त्यापुर्वीच पाकिस्तानी खेळाडूंना धडकी भरल्याचे दिसून येत आहे.

खेळाडूंच्या मनात भरलेल्या भितीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हाय-प्रोफाइल स्पर्धेचा सामना करण्यासाठी संघासह मानसशास्त्रज्ञ भारतात पाठवण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ अन् कर्णधार बाबर आझम यांच्या भेटीनंतरच घेतला जाणार आहे. पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानसाठी मानसशास्त्रज्ञांची उपस्थिती अनिवार्य आहे, कारण ते 2016 नंतर प्रथमच भारताला भेट देत आहेत.

जका अश्रफ पीसीबीचे अध्यक्ष असताना त्यांनी खेळाडूंसोबत काम करण्यासाठी प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मकबूल बाबरी यांना बोलावले होते आणि ते 2012-13 मध्ये त्यांच्यासोबत भारतात आले होते. 2011 च्या विश्वचषकासाठी भारताच्या दौऱ्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंनी क्रीडा मानसशास्त्रज्ञांसोबत काही सत्रे केली होती.

Prakash Harale: