६ दिवसांत ५ टीम गाशा गुंडाळणार; पाकिस्तानची घरवापसी नाही? सगळी समीकरणं एका क्लिकवर

मुंबई : (World Cup 2023) भारतात सुरू असलेली आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा रंजक टप्प्यावर पोहोचली आहे. लवकरच उपांत्य फेरीचे सामने सुरू होतील. आतापर्यंत २४ सामने झाले आहेत. पण येत्या ६ दिवसात उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट होईल. ३१ ऑक्टोबरला स्पर्धेतील ३१ वा सामना खेळवला जाईल. त्याआधी २९ ऑक्टोबरला भारत वि. इंग्लंड सामना होईल. या सामन्यात विजय मिळवल्यास भारताचं उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित होईल.

सगळ्यात वाईट अवस्था पाकिस्तानची आहे. २७ ऑक्टोबरला त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. आफ्रिकेचा गेल्या काही सामन्यांमधील फॉर्म पाहता पाकिस्तानच्या विजयाची आशा कमीच आहे. बाबर सेनेनं हा सामना गमावल्यास त्याची घरवापसी नक्की असेल. पाकिस्तानसोबतच श्रीलंका, अफगाणिस्तान, नेदरलँड्स आणि बांग्लादेशदेखील उपांत्य फेरीच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

नेदरलँड्स आणि बांग्लादेशनं आतापर्यंत ५ पैकी केवळ १ सामना जिंकला आहे. तर अफगाणिस्ताननं ५ पैकी २ सामने जिंकले आहेत. पण त्यांचा पुढील सामना श्रीलंकेशी आहे. लंकेचा पराभव करणं त्यांना अवघड जाईल. पण त्यांनी धक्कादायक निकाल नोंदवला तरीही पुढील वाट बिकट आहे. त्यांना पुढे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना करायचा आहे.

दक्षिण आफ्रिकेनंतर पाकिस्तानला ३१ ऑक्टोबरला बांग्लादेशविरुद्ध खेळायचं आहे. हा सामनादेखील पाकिस्तानसाठी सोपा नसेल. पाकिस्तानला नमवण्याची क्षमता बांग्लादेशमध्ये आहे. २८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामना रंगेल. हा सामना निर्णायक असेल. त्यामुळे ३१ ऑक्टोबरपर्यंत वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक रंगत असेल.

श्रीलंकेनं आतापर्यंत ४ सामन्यात केवळ १ विजय मिळवला आहे. त्यांचा पाचवा सामना आज (२६ ऑक्टोबर) इंग्लंडविरुद्ध होईल. हा सामना हरणाऱ्या संघाचं आव्हान संपुष्टात आल्यात जमा असेल. कारण इंग्लंडनंही आतापर्यंत ४ सामन्यात केवळ १ विजय मिळवला आहे. त्यानंतर त्यांना भारताचाही सामना करायचा आहे.

Prakash Harale: