‘…जर मला काहीही झालं तर त्याचं उत्तर संजय पाडेंना द्यावं लागेल’; कंबोज यांचा इशारा

मुंबई : शनिवारी भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. यावेळी सोमय्या यांच्या गाडीवर खार पोलीस स्टेशन परिसरात शिवसैनिकांनी दगडफेक केली. यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तपालं आहे. यावर भाजपातून अनेक तिखट प्रतिक्रिया देखील येत आहेत. दरम्यान, या हल्ल्याला पोलीस कमिश्नर संजय पांडे जबाबदार असून त्यांनी हा हल्ला घडवून आणाला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. आता या वादात भाजपाच्या मोहित कंबोज यांनी उडी घेतली असून त्यांनी खळबळजनक माहिती दिली आहे.

मोहित कंबोज यांनी एक ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, गेल्या ६ महिन्यांपासून मी मुंबई पोलीस आयुक्तांना माझ्या सुरक्षेबाबत अगणित पत्रे लिहिली आहेत. पण आजतागायत पोलीस दलाकडून कोणताच प्रतिसाद आलेला नाही. मला रोज धमक्या येतात. माझ्यावर हल्लेही होतात, हे जंगलराजच आहे, जिथे लोकांचे ऐकले जात नाही!, यादरम्यान जर मला काहीही झाले तर त्याचे उत्तर संजय पांडे यांना द्यावे लागले, असा इशारा कंबोज यांनी दिला आहे.

Sumitra nalawade: