मुंबई : राणा दाम्पत्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा वाचण्यासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी झालेल्या राड्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. सध्या दोघेही भायखळ्याच्या तुरुंगात असून वकिलांनी नवनीत राणांच्या तब्येतीबद्दल तुरुंग अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे.
आमच्या क्लायंटला म्हणजेच नवनीत राणांना स्पॉन्डिलायसीसचा आजार आहे. त्यांना तुरुंगात जमिनीवर बसायला आणि झोपायला लावलं. त्यामुळे हा आजार अधिक बळावला आहे. डॉक्टरांनी लेखी देऊनही त्यांच्या सीटी स्कॅनच्या विनंतीकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांना काही झालं तर तुरुंग अधिकारी जबाबदार असेल, असं नवनीत राणांच्या वकिलांनी भायखळा कारागृहाच्या अधीक्षकांना लिहिलं आहे.