“भारताला टी-20 विश्वचषक जिंकायचा असेल तर…”, रिकी पॅान्टिंगचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | Ricky Ponting – टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मधील भारत विरूद्ध झिंम्बाब्वे सामना येत्या रविवारी (6 नोव्हेंबर) रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ मेलबर्नमध्ये पोहोचला आहे. यादरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाॅन्टिंगनं (Ricky Ponting) एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. भारताला टी-20 विश्वचषक जिंकायचा असेल तर विराट कोहलीनं खेळपट्टीवर टिकणं आवश्यक आहे, असं मत रिकी पाॅन्टिंगनं व्यक्त केलं आहे.

रिकी पॉन्टिंगने म्हटलं आहे की, “गेल्या काही महिन्यांपासून मी रेकॉर्डवर आहे आणि विराटसह भारतानं अशा मोठ्या स्पर्धेत यावं. हे मला कसं महत्त्वाचं वाटलं याबद्दल बोलताना तो म्हणाला, जेव्हा तुम्ही यासारख्या मोठ्या इव्हेंटमध्ये येता, तेव्हा तुम्हाला तुमच्या अनुभवी स्टार खेळाडूंची गरज असते. ते मोठ्या सामन्यामध्ये खेळताना टिकले की काय होते, हे आपण पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पहिल्यांदाच पाहिलं आहे.”

“भारताच्या सलामीच्या सामन्यात कोहलीच्या 53 चेंडूत नाबाद 82 धावांच्या खेळीच्या जोरावर संघानं अंतिम षटकात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर चार विकेट राखून विजय मिळवला. केवळ कोहलीच खेळपट्टीवर टिकून भारताला विजय मिळवून देऊ शकतो, असा मला विश्वास आहे”, असं पाॅन्टिंग म्हणाला.

पुढे पॉन्टिंग म्हणाला,”भारताने अद्याप सर्वोत्तम कामगिरी केली नसावी, पण विराटने काही सामन्यांमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. आता तो स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. मला वाटतं की, भारताला प्रगती करायची असेल आणि जिंकायचे असेल तर त्यांना विराटची गरज आहे. कोहली खेळपट्टीवर टिकून चांगला खेळण्याची गरज आहे.”

दरम्यान, सध्या विरोट कोहली (Virat Kohli) जबरदस्त खेळी करताना दिसत आहे. त्यानं टाॅप ऑर्डर कोसळल्यानंतर भारताला वाचवलं आणि अनेक धावा केल्या आहेत. तो सध्या 220 धावा करून स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

Sumitra nalawade: