‘मोदी आहे तर कठीण आहे’ जीडीपी नरकात, महागाई आकाशात…

तेलंगना : जीडीपी नरकात आहे तर महागाई आकाशात आहे. मोदी असेपर्यंत यात सुधारणा होणे अवघड आहे, असे म्हणत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी व आमदार कविता यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. के चंद्रशेखर राव यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर मुलीने हे विधान केले. तेलंगणात २०२३ साली विधानसभा निवडणुका होणार आहे. परंतु, मे २०२२ मध्येच सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले.

दरम्यान, अलीकडेच राहुल गांधी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी तेलंगणात सभा घेतल्या. दुसरीकडे केसीआर यांचा पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीचे नेतेही सक्रिय झाले आहेत. ‘मोदी आहे तर कठीण आहे. जीडीपी नरकात आहे तर महागाई आकाशात आहे. पेट्रोल-डिझेल व गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. उत्पन्न पाताळात आहे. कारण, मोदी आहे तर कठीण आहे’ असे व्हिडिओ ट्विटरवर शेअर करीत कविता म्हणाल्या.

Prakash Harale: