शरद पवार मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळं असतं; यशोमती ठाकूर यांच्या विधानावर सुशीलकुमार यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळं असतं असं विधान राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर भाषणामध्ये केलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेनंही या प्रतिक्रियेवर उत्तर दिलं आहे. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार यांनी देखील यावर भाष्य केलं आहे.

सुशीलकुमार शिंदे यांना प्रसारमाध्यमांनी यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यासंबंधी विचारलं असता त्यांनी त्यांनाच विचारा असं सांगत उत्तर देणं टाळलं. दरम्यान युपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचे नाव चर्चेत असलं, काही लोकांची मागणी असली तरी अध्यक्षपदासाठी जागाच खाली नाही आहे असंही ते म्हणाले.

Sumitra nalawade: