देशाची प्रतिमा ‘अल्पसंख्यांक विरोधी’ बनली तर; रघुराम राजन यांचा इशारा  

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे वेळोवेळी देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर भाष्य करुन चिंता व्यक्त करत असतात. देशात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, जगात भारताची प्रतिमा ‘अल्पसंख्यांक विरोधी’ बनली तर भारतीय कंपन्यांचं नुकसान होऊ शकतं. भारतीय उत्पादनांसाठी मार्केटमध्ये ही धोक्याची घंटा आहे अशी चिंता राजन यांनी व्यक्त केली आहे.

माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, भारताची अशी प्रतिमा झाल्यानंतर विदेशी सरकारं आपल्या राष्ट्रावर विश्वास ठेवायला सहज तयार होणार नाहीत. अशामुळं गुंतवणूकदार आपल्याकडे गुंतवणुकीच्या दृष्टीनं पाहणं बंद करु शकतात. लोकशाहीमध्ये गोष्टी नेहमी सोप्या नसतात. यात नेव्हिगेशनची गरज असते. त्यांनी म्हटलं की, लोकशाहीत वेळोवेळी सर्व पक्षांशी चर्चा करावी लागते. गरज पडल्यास काही बदल देखील करावे लागतात.

त्यांनी रशिया आणि चीनचं उदाहरण देत म्हटलं की, या देशांमध्ये चेक आणि बँलंस नसल्यानं त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय. अल्पसंख्यांकांसोबत दुर्व्यवहार जगभरात चांगली प्रतिमा तयार करत नाही. अशामुळं चांगले गुंतवणूकदार दूर जाऊ शकतात, त्यांच्या तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोणामध्ये  विश्वासार्हता नसेल, असं राजन यांनी म्हटलं आहे.  

 

Prakash Harale: