“फडणवीसांचे पंख छाटले नाहीत तर…”; तृप्ती देसाईंचं वक्तव्य चर्चेत!

मुंबई : (Trupti Desai On Devendra Fadnavis) मागच्या १०-१२ दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष रंगला आहे. या संघर्षात शिवसेनाचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. मात्र, मुख्यमंत्रिपदी येतील अशी अपेक्षा असतानाच पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर महाराष्ट्र भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. विरोधकही या गोष्टीचा फायदा घेत त्यांना डिवचावत आहेत.

दरम्यान, यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यात आता विषयी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांची बाजू घेतली आहे. देसाई यांनी फडणवीस यांचे समर्थन करणारी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये देसाई म्हणाल्या की, देवेंद्रजींचे पंख छाटले गेले नाहीत, तर अजून उंच भरारी मारता यावी यासाठी हा केलेला प्रयोग आहे‌. मुख्यमंत्री पदावर असल्यावर त्यांना नगरपालिका निवडणुकीत विशेष लक्ष देता येणार नाही.

भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेतलेलं पहायला मिळत आहे. त्यांना उंच भरारी मारता यावी म्हणून हा एक प्रकारे केलेला प्रयोग आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.

Prakash Harale: