“जर तुम्हाला दहा मुलं व्हायला नको असतील तर…”, विजय देवरकोंडाचं वक्तव्य चर्चेत!

मुंबई | Vijay Deverakonda’s Statement In Discussion – ‘कॉफी विथ करण’चे 7 वे पर्व हे सध्या गाजताना दिसत आहे. या लोकप्रिय शोमध्ये अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावताना दिसतात. इतकंच नव्हे तर कलाकार मंडळींना या शोमध्ये खासगी आयुष्याबाबत प्रश्न विचारले जातात. तसंच नुकतंच या कार्यक्रमात अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडेनं हजेरी लावली होती. यावेळी विजयने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून विजय देवरकोंडा त्याच्या आगामी ‘लाइगर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तसंच ‘लाइगर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील विजयच्या भूमिकेची चर्चा सध्या चांगलीच सुरु आहे.

तसंच करण जोहरच्या या कार्यक्रमात विजय देवरकोंडाला कंडोमच्या जाहिरातीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुला भविष्यात कंडोमच्या जाहिरातीत काम करायला आवडेल का? असा प्रश्न करणने त्याला विचारला होता. त्यावर त्याने होकार दर्शवला आणि तो ती जाहिरात कशाप्रकारे करेल याबद्दलचे प्रात्यक्षिकही त्याने दाखवले. “जर तुम्हाला भविष्यात दहा मुलं व्हायला नको असतील तर तुमच्यासाठी हा खरोखरच स्मार्ट आणि सुरक्षित उपाय आहे”, अशाप्रकारे त्याने कंडोमच्या जाहिरातीचे प्रात्यक्षिकही करुन दाखवले.

Sumitra nalawade: