नवी दिल्ली : आजच्या सोशल मीडियाच्या जगात प्रत्येक व्यक्ती व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या वेगवेगळ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा वापरत करत आहेत. सर्वात जास्त वापरलं जाणार आणि सर्वांना वापरताना सोयीस्कर असा व्हॉट्सअॅप हा सोशल मिडीयाचा प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये सातत्यानं अपडेट होत आहे. मागच्या काही महिन्यांपासून जर बघितल तर काही ना काही बदल सातत्यानं केला जात असल्याचं दिसत आहे. व्हॉट्सअॅपने युझर्सची गरज लक्षात घेऊन या गोष्टी अपडेट केल्या आहेत. प्रत्येक कंपनी काहीतरी नवीन शोधून प्रसिद्धी मिळवण्याचं बघत असते. आता व्हॉट्सअॅपने एक असं नवं फीचर आणलं आहे. ज्यामध्ये आता तुम्हाला स्वता:चा डीपी, लास्ट सीन कोणी बघायचा? कोणाला दिसला नाही पाहिजे याची सोय देखील केली आहे.
काही ठराविक युझर्स व्यतीरिक्त इतर कुणालाही तुमचा व्हॉट्सअॅप डीपी दिसणार नाही. अशी सोय या फिचरमध्ये करण्यात आली आहे. या व्हॉट्सअॅप फिचर मध्ये नक्की काय आहे? तर यामध्ये व्हॉट्सअॅपने नवीन बदलामध्ये म्हटलं आहे. तुमच्या गोपनीय माहितीच संरक्षण करण्यासाठी आम्ही तुमच्या गोपनीयता नियंत्रण सेटिंग्जमध्ये नवीन पर्याय सादर केले आहेत. यामध्ये तुम्ही तुमच्या संपर्कातील तुम्हाला हव्या असणाऱ्या लोकांनाच फोटो, स्टेट्स, लास्ट सीन दिसू शकतो. आता तुम्हाला यामध्ये एक नवा पर्याय आला असून कुणी लास्ट सीन, बायो आणि प्रोफाईन फोटो पहायचा हे तुम्ही ठरवू शकता.
दरम्यान, सर्वात प्रथम सेटिंगमध्ये जावा त्यानंतर अकाऊंटवर जाऊन प्रायव्हसीवर क्लिक करा. त्यानंतर प्रोफाईल फोटोवर क्लिक केल्यावर तिथे तुम्हाला Everyone, My Contact, My Contact Except आणि Nobody हे पर्याय दिसतील. यातील तुम्हाला My Contact Expect क्लिक करा. ही प्रोसेस केल्यावर तुमची Contact List उघडेल, त्यातील तुम्हाला ज्यांना तुमचा DP हा लवपायचा असेल त्यांना सिलेक्ट केल्यावर आता तुमचा डीपी ते लोक पाहू शकणार नाहीत.