लग्नाआधीच इलियाना डिक्रूजने दिली गुड न्यूज; ‘या’ अभिनेत्रीच्या भावाला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण

मुंबई | इलियाना डिक्रूज (Ileana D’Cruz) ही हिंदी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून इलियाना चित्रपटांपासून दूर आहे. परंतू त्यानंतर आता इलियाना परत एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियाद्वारे तिने आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. इलियानाने प्रेग्नन्सी जाहीर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती दिली. लहान बाळाच्या ड्रेसचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तर आणखी एका फोटोमध्ये इलियानाच्या गळ्यात एक पेंडंट पहायला मिळतंय. ‘मम्मा’ अशा अक्षरांचा तो पेंडंट आहे. हे दोन्ही फोटो पोस्ट करत इलियानाने कॅप्शनमध्ये ‘लवकरच..’ असं लिहिलं आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. परंतु लग्नाआधी गरोदर असल्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इलियाना बरीच वर्षे अँड्र्यू नीबोन या ऑस्ट्रेलियन फोटोग्राफरला डेट करत होती. हे दोघं लग्न करणार अशीही चर्चा होती. मात्र 2019 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर इलियानाचं नाव कतरिनाच्या भावाशी जोडलं गेलं. मात्र या दोघांनी सोशल मीडियावर किंवा माध्यमांसमोर कधीच त्याची कबुली दिली नाही. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्यासोबत हे दोघं पार्टी करतानाही दिसले होते. ज्यामध्ये विकी कौशल, कतरिना कैफ, इलियाना, सेबॅस्टिनय, इसाबेल कैफ, आनंद तिवारी आणि मिनी माथुर पहायला मिळाले होते.

Dnyaneshwar: