मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत वाहनांसाठी वापरले जाणारे फास्ट स्टॅग संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता राज्यातील सर्व वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आले आहेत. हा राज्यातील चारचाकी वाहनधारकांच्यादृष्टीने खूप मोठा निर्णय मानला जात आहे. १ एप्रिल २०२५ या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे या दिवसापासून राज्यात सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग (Fast -Tag ) अनिवार्य असेल. प्रवास वेगवान करण्याच्या उद्देशाने सरकारकडून फास्टटॅग लावणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता टोलनाक्यावरील वाहनांची गर्दी कमी होणार आहे. फास्ट टॅग प्रोग्राम ही radio-frequency identification technology वर चालते. फास्ट टॅगमुळे टोल नाक्यावर थांबून टोल न देता फास्ट टॅगचा कोड स्कॅन करून थेट अकाऊंट मधून पैसे कापले जातात. याकरिता फास्टटॅगसोबत लिंक केलेल्या बँक वॉलेटमधून डिजिटली पैसे कापले जातात. फास्ट टॅगची वैधता ५ वर्षांची असते. तुमच्या बँक अकाऊंटमधील टोलची रक्कम आपोआप कापली जाते. फास्ट टॅगमुळे टोलनाक्यावर वाहनांची गर्दी टाळता येते.