Threads : मेटाच्या (Meta) मालकीच्या इन्स्टाग्रामने ट्वीटरशी (Twitter) स्पर्धा करण्यासाठी आपले नवीन अॅप थ्रेड्स (Threads) नुकतेच लाँच केले आहे. हे एक नवीन सोशल नेटवर्किंग अॅप आहे. त्याची थेट स्पर्धा ट्विटरशी असेल. थ्रेड्स अॅप ट्वीटरसारखेच आहे. ट्विटरला टक्कर देण्यासाठी मेटाने नवा थ्रेड्स अॅप (Threads) लाँच केला आहे. थ्रेड्स अॅपकडे ट्विटर किलर अॅप म्हणूनही पाहिलं जात आहे. मेटा च्या नुकत्याच लाँच झालेल्या थ्रेड्स अॅपला कोट्यवधी युजर्सने पसंती दर्शवली आहे. अवघ्या 24 तासांत थ्रेड्सवरील पोस्ट आणि युजर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. अवघ्या काही तासांत युजर्सने थ्रेड्स अॅपवर उड्या मारल्या आहेत. यानंतर ट्विटरला टक्कर देणाऱ्या थ्रेड्स अॅपच्या मीम्स ट्विटरवरच व्हायरल झाल्या आहेत.
अवघ्या 24 तासांत Threads ची धमाल!
नेटकऱ्यांनी मीम्स व्हायरल करत ट्विटरला डिवचायला सुरुवात केली आहे. तर काहींनी ट्विटरचाच पर्याय उत्तम असल्याचं म्हटलं आहे. थ्रेड्सकडे ट्विटरला पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. एकीकडे ट्विटरकडून युजर्सवर वेगवेगळे निर्बंध लावण्यात येत आहेत. त्यामुळे ट्विटरच्या पेड सर्व्हिस ऐवजी लोक थ्रेड्सला प्राधान्य देतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.