आळंदीत वसुली करणार्‍यांची मुजोरी; घरी जाऊन महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ

आळंदी | Alandi News – कसलीही माहिती न देता कोणत्याही वेळी हप्ता वसुल करण्यासाठी घरी जाणे, घरी असलेल्या महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणे, आजूबाजूच्या लोकांमध्ये महिलांबाबत अपमानजनक वक्तव्य करणे असे प्रकार आळंदीमध्ये (Alandi) मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

फायनान्स (Finance) कंपन्यांचे हप्ता वसुली करणारे लोक कोणत्याही वेळी घरी जात असल्याने घरातील महिलांचा मनस्ताप वाढला आहे. याबाबत आळंदी पोलिसात (Alandi Police) तक्रार देखील दाखल करण्यात आलेल्या आहेत, तरी देखील हे प्रकार थांबताना दिसत नाहीत.

एका महिलेने आळंदी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तिच्या घरी कोणत्याही वेळी कल्पना न देता फायनान्स कंपनीचे वसुली करणारे लोक येतात, मोठमोठ्याने शिविगाळ करतात असा आरोप महिलेने केला आहे. वसुलीसाठी आलेल्या नीलेश वाबळे नावाच्या व्यक्तीने महिलेचे व्हिडीओ काढले असून ते लोक ‘आमच्या पोलीसांसोबत ओळखी आहेत, आम्ही काहीही करू शकतो’ अशा धमक्या देत असल्याचेही आरोप महिलेने केले आहेत. यामुळे परिसरातील लोकांना देखील मनस्ताप होत असल्याचे महिलेने तक्रारीमध्ये सांगितले आहे.

Sumitra nalawade: