सुरक्षा दलानं अतिरेक्यांना सळो की पळो करून सोडलं; अनंतनागमध्ये ड्रोनद्वारे केला बॉम्ब वर्षाव

अनंतनाग | Anantnag – जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) अनंतनागमध्ये (Anantnag) सुरक्षा दलाकडून अतिरेक्यांविरोधात कारवाई सुरू आहे. त्यामुळे सुरक्षा दलानं अतिरेक्यांना सळो की पळो करून सोडलं आहे. अतिरेकी कोकरनाग जंगलात लपले आहेत त्यामुळे त्यांना हिसकावून लावण्यासाठी सुरक्षा दलाकडून ड्रोनद्वारे आणि रॉकेट लॉन्चरद्वारे बॉम्ब वर्षाव केला जात आहे. या बॉम्ब वर्षावामुळे अतिरेकी जीवमुठीत घेऊन पळ काढताना दिसत आहेत.

अनंतनागमध्ये तीन दिवसांपूर्वी अतिरेक्यांविरोधात कारवाई सुरू असताना तीन जवान शहीद झाले होते. त्यामध्ये कर्नल मनप्रीत सिंग, जम्मू काश्मीर पोलीस दलातील डीएसपी हुमायूं भट आणि मेजर आशिष यांचा समावेश आहे. तर आता सुरक्षा दलानं अतिरेक्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांना जंगलातच घेरलं आहे.

अतिरेक्यांनी जंगलातील जमिनीत तळ निर्माण केला होता. त्यामुळे ते जमिनीत तळ ठोकून बसले होते. पण, सुरक्षा दलानं ड्रोनद्वारे बॉम्ब हल्ला करत अतिरेक्यांचे तळ उद्धवस्त केले आहेत. तसंच अतिरेक्यांचा नोमोनिशान मिटत नाही तोपर्यंत हे ऑपरेशन सुरू राहणार असल्याचं भारतीय लष्करानं म्हटलं आहे.

Sumitra nalawade: