‘आश्रम ३’ वेब सिरीजमध्ये ‘या’ मराठी अभिनेत्रीने दिले जबरदस्त सीन्स, पाहा कोण आहे ती?

मुंबई : Ashram3 Web Series On Isha Day | लवकरच ‘आश्रम ३’ वेब सिरीज (Ashram Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यामध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtra’s Comedy Fair) या मराठी शोमधील मराठी अभिनेत्री आणि आपल्या विनोदाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी ईशा डे (Isha Day) दिसणार आहे. नुकताच या वेब सिरीजचा पोस्टर शेयर करत ईशाने शूटिंग दरम्यानचे अनेक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'(Maharashtra’s Comedy Fair) या शोमधील छोट्या पडद्यावरील सर्वच कलाकार आपल्या अभिनयातून,कलेतून प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पडत असतात. या शोमुळे हास्यरसिकांना विनोदाची मेजवानी तर मिळतेच पण त्यासोबतच टेन्शनपासून काही वेळ मुक्ती देखील मिळत असते. या शोमुळे अनेक कलाकारांना आपल्या अभिनय कौशल्यमुळे चित्रपटसृष्टीमध्ये संधी मिळत असते. याच शोमधील ईशा डे (Isha Day) ही मराठी अभिनेत्री असून ती आता आपल्याला ‘आश्रम ३’मध्ये बॉबी देओलसोबत (Bobby Deol) काम करताना दिसणार आहे.

ईशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आश्रम ३ या वेब सीरिजच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. ईशानं लंडनमधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. तसंच छोट्या पडद्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम देखील केलं आहे. याआधी तिन दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेत.तसंच ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ मालिकेत ईशा अभिनेता प्रियदर्शन जाधव सोबत स्क्रिन शेअर करताना दिसली होती. याचबरोबर भाडिपाच्या वेब सीरिजमध्येही ईशाने काम केलेलं असून आता ‘आश्रम ३’ या वेब सीरिजमध्ये ईशाला बघण्यासाठी प्रेक्षकांना ओढ लागली आहे. यामुळे ईशाच्या पोस्टवर चाहते आणि कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Nilam: