धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू

fire 1fire 1

पिंपरी : Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) एक मोठी घटना घडल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग (Fire) लागली आहे. या आगीमध्ये सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर आणखी काही कामगार त्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तळवडे येथील फटाका गोदामाला ही आग लागली होती, अशी माहिती समोर येत आहे.

हे फटाका गोदाम विनापरवाना सुरू होते, असेही म्हटले जात आहे. काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवत आहेत. दुसरीकडे ७ ते ८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आत्तापर्यंत ७ मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. घटनास्थळी कामगारांचा शोध सुरुच असल्याची माहिती समोर येत आहे.

Sumitra nalawade:
whatsapp
line