मुंबई Maharashtara Cabine : महाराष्ट्रात सत्तांतर होऊन महिना उलटला असताना राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पावसाळी अधिवेशन देखील रखडलेले आहे. अशाप्रकारे विरोधी पक्षांतील नेत्यांकडून सरकारला मंत्रिमंडळाबाबत प्रश्न विचारले जात आहेत. मात्र लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं शिंदे – फडणवीस सरकारकडून सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ ऑगस्टच्या आधीच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती दिलेली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागू शकणाऱ्या नेत्यांची यादी समोर आली आहे.
‘म्हणून’ मंत्रिमंडळ विस्तार रखडला; विरोधकांची टीका
शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गटातील आमदार भाजपसोबत सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे गट आणि भाजप पक्षातील नेत्यांमध्ये मंत्रिपदासाठी चुळबुळ सुरु आहे. शिंदे गटातील अनेक नेत्यांना मंत्रिपदाच्या अपेक्षा आहेत तर भाजपमधील दिग्गज नेत्यांना देखील मंत्रिपदे हवे आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्याचबरोबर दिल्लीतून ऑर्डर येत नसल्याने देखील मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.
या नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे दिल्ली दौरे सुरूच आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होऊ होईल अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळात वर्णी लागू शकणाऱ्या नेत्यांची संभाव्य यादी समोर आली आहे.
शिंदे गटातील आमदार – दादा भुसे (Dada Bhuse), उदय सामंत (Uday Samant), संदीपान भुमरे (Sandeepan Bhumre), शंभूराज देसाई (shambhuraj Desai), अब्दुल सत्तार (Abdul Sattar), संजय शिरसाट (Sanjay Shirasat), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), बच्चू कडू (Bacchu Kadu).
भाजप आमदार – सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), गिरीश महाजन (Girish Mahajan), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushn Vikhe Patil), नितेश राणे (NItesh Rane), बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar), जयकुमार रावल (Jaykumar Rawal), संजय कुटे (Sanjay Kumar).