मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या शोरूमचे उद्घाटन

पुणे : सोने आणि हिर्‍यांच्या आभूषणांसाठी प्रसिद्ध असणारे मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने पुण्यातील सातारा रोडच्या महावीर पार्क बिल्डिंग ‘ए’ येथे आपले पाचवे शोरूम सुरू केले असून हे महाराष्ट्रातील त्यांचे १५ वे दालन आहे.यावेळी मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्याचे माननीय महापौर मुरलीधर किसन मोहोळ यांच्या हस्ते ह्या स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले.

या शुभारंभाप्रीत्यर्थ या शोरूममध्ये, राज्याच्या समृद्ध परंपरांचे प्रतिनिधित्व करणारे विविध ब्रँडच्या नवीनतम दागिन्यांचे संग्रह प्रदर्शित करण्या आले आहेत.जवळपास ५,००० चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले हे शोरूम विविध डिझाईन्सच्या दागिन्यांचे विस्तृत संग्रह तसेच वाजवी घडणावळ शुल्कासह दागिन्यांच्या वाजवी किमती आणि ग्राहकांना खर्चलेल्या पैशाचे समर्पक मूल्य मिळेल अशा भारतातील सर्वोत्तम सोन्याचे दर प्रस्तुत करण्याचा दावा करते.

सोने, हिरे, मौल्यवान रत्न आणि हलक्या वजनाच्या नववधूंच्या दागिन्यांच्या कलेक्शनच्या विस्तृत श्रेणीचे प्रदर्शन करण्याव्यतिरिक्त, या शोरूममध्ये महाराष्ट्रीय वधूंसाठी खास पारख केलेल्या पारंपारिक आणि समकालीन डिझाइन्सच्या नवीनतम दागिन्यांचा संग्रह ठेवण्यात आला आहे.

Dnyaneshwar: