पुणे : अमेरिकेतील डब्लिन सीए येथे मुख्यालय आणि इतर अनेक ठिकाणी व भारतात बंगलोर येथे कार्यालये असलेली ट्रूग्लोबल या अग्रगण्य माहिती-तंत्रज्ञानसेवा प्रदाता कंपनीने आता पुणे शहरात बाणेर परिसरात आपल्या कार्याचा विस्तार करत नवीन कार्यालयाचे उद्घाटन प्रसिद्ध क्रिकेटर रॉबिन उथप्पा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ट्रूग्लोबल कंपनीचे सीईओ इब्राहिम शरीफ, व्हीपी ग्लोबल डिलेव्हरीचे जैद महवी आणि कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
ट्रूग्लोबल जगभरातील अनेक फॉर्च्युन ५०० कंपन्यांसह विविध ग्राहकांसह काम करणारी शीर्ष जागतिक आयटी सेवा कंपनी आता पुण्यात आली आहे. उद्योग क्षेत्रातील आपले समृद्ध ज्ञान आणि विचार नेतृत्वाने सक्षम असलेल्या एंड-टू-एंड सोल्युशन आर्किटेक्चरच्या अंमलबजावणीच्या विस्तृत अनुभवांच्या आधारे आपल्या ग्राहकांसाठी गुंतागुंतीची व्यावसायिक आव्हाने सोडवण्यासाठी ट्रूग्लोबल प्रसिद्ध आहे.
ट्रूग्लोबलने जगातील फेसबुक, ट्विटर, एनविडिया, लिंक्डइन, पेनुंब्रा, सिमँटेक, जीनेनटेक आणि अन्य अनेक सर्वोत्तम कंपन्यांसोबत काम केले आहे. ट्रूग्लोबलचे मुख्य कार्यालय डब्लिन सीएमध्ये असून डलास टीएक्स व वॉशिंग्टन डीसी येथे कार्यालये व बंगलोरमध्ये ग्लोबल ऑपरेशन्स सेंटर आहेत.