सिंबायोसिसतर्फे ‘सिंबी टॉक्स’चे उद्‌घाटन

उद्योग उभारणीसाठी औद्योगिक कौशल्ये

पिंपरी : सिंबायोसिस स्कील्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, नॅशनल एच.आर.डी. नेटवर्क पुणे आणि पीसीएमसी स्मार्ट सारथी यांच्या संयुक्त विद्यमाने राजेश पाटील, आयुक्त, आणि डॉ. स्वाती मुजुमदार यांच्या हस्ते “सिंबी टॉक्स” या उद्योगविषयक चर्चासत्राच्या मालिकेचे उद्‌घाटन करण्यात आले.

सिंबी टॉक्सचे उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याशी संबंधित रोजगार क्षेत्रातील समस्या, संधी आणि आव्हाने यावर चर्चा करण्यासाठी विविध उद्योगांतील भागधारकांना या सिंबी टॉक्सच्या व्यासपीठावर आणणे आहे.

या उद्‌घाटन समारंभात उद्योग, शैक्षणिक आणि इतर भागधारक हे सर्व घटक एकत्रित आल्यामुळे उद्योग आणि शिक्षण या दोहोंमधील दरी कमी करण्यासाठी सिंबी टॉक्ससारखे व्यासपीठ नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावतील, असे डॉ. स्वाती मुजुमदार (प्र-कुलपती सिंबायोसिस स्कील्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी) यांनी सांगितले.

एक कौशल्य विद्यापीठ म्हणून सिंबायोसिसने आपल्या बाजारपेठेत नोकरीसाठी कोणती कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत, तसेच काम करताना त्या कौशल्याची गरज काय आहे आणि उद्योग क्षेत्रातील नोकरीच्या काय संधी उपलब्ध आहेत हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांकडून समजून घेतले. सिंबायोसिसमध्ये विद्यार्थ्यांना असे कौशल्याभिमुख अभ्यासक्रम शिकविले जातात, तसेच त्या विद्यार्थ्यांकडून उद्योगासाठी उपयोगी असलेले सर्व कौशल्ये त्या विद्यार्थ्यांना शिकविली जातात. जेणेकरून आमचे विद्यार्थी हे नोकरीच्या पहिल्या दिवसापासून त्या कामासाठी तयार असतात.

कोरोना काळानंतर नोकरी आणि उद्योग क्षेत्रात बदल झाला आहे. सध्याच्या काळासाठी अल्पकालीन अभ्यासक्रम आम्ही तयार केले आहेत, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना या नव्या काळाशी आणि त्यातील उद्योगासाठी तयार राहतील. मला आशा आहे की, सिंबी टॉक्स सर्व भागधारकांना एका समान व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठीच्या समान उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करेल. राजेश पाटील, आयुक्त पीसीएमसी (PCMC) यांनी एसएसपीयूच्या या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि विद्यार्थ्यांसाठी कौशल्ये किती महत्त्वाची आहेत हे अधोरेखित केले. राजेश पाटील म्हणाले, “उद्योग झपाट्याने बदलत आहेत आणि ऑटोमेशनमुळे नोकऱ्या असुरक्षित आहेत.

गेल्या दोन वर्षांत व्यवसाय करण्याची पद्धतही बदलली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास आत्मसात केले पाहिजेत. कारण आज उद्योगाला एका उत्साही आणि कार्यक्षेत्राशी जुळवून घेणार्‍या कर्मचार्‍यांची गरज आहे. जे तंत्रज्ञानातील बदलांशी जुळवून घेऊ शकेल. सध्या कामाच्या ठिकाणी प्रभावीपणे कामगिरी करण्यासाठी विविध कौशल्ये आणि क्षमतांची आवश्यकता आहे. सिंबायोसिस अशाप्रकारच्या उद्योगाशी संबंधित समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे.”

त्यानंतर “फ्युचर ऑफ मॅन्यूफॅक्चरिंग सेक्टर: न्यू इमर्जिंग ट्रेंड्स अँड जॉब्स” या परिषदेमधील पहिले चर्चासत्र झाले. श्री.जॉर्ज कार्डोझ, हेड एचआर – फोर्ब्स मार्शल, श्री. शिरीष कुलकर्णी, एचआरडी – केएसबी पंप्स लिमिटेड, श्री. राहुल बगळे, ग्रुप एचआर हेड–फोर्स मोटर्स लिमिटेड, श्री जॉयस सॅम्युअल, डायरेक्टर एचआर – ग्रुप अँटोलिन यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला आणि त्यांची भूमिका मांडली. तज्ज्ञांनी या चर्चासत्रात या विषयातील विविध पैलू आणि मॅन्युफॅक्चरिंग उद्योगात नोकऱ्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी नवा दृष्टिकोन (अंतर्दृष्टी) समजावून सांगितला. ज्यामुळे विद्यार्थ्यांना उत्पादन क्षेत्रातील उदयोन्मुख ट्रेंड आणि नोकरीच्या संधी याविषयी माहिती मिळाली. एकीकडे, सिंबीटॉक्स भागधारकांना उद्योग तज्ञ आणि विविध कंपन्यांच्या एचआर प्रमुखांशी संवाद साधण्याची संधी निर्माण करेल; दुसरीकडे, हे उद्योगाच्या गरजांबद्दल जनसामान्यांना शिक्षित करण्यास मदत करेल. वेगवेगळ्या विषयांवर दर महिन्याला एक चर्चा होणार आहे.

Dnyaneshwar: