दिलासादायक! पांढऱ्या सोन्याचे दर वाढणार? कापसाला मिळणार 11 हजार रुपये क्विंटल भाव

(Increase in Cotton Prices) सध्या महाराष्ट्रासह (Maharashtra) पंजाबमध्ये कापसाच्या दरात (Cotton Prices) सातत्यानं घसरण होत आहे. याचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळं काही शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, असं असतानाच आता शेकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. काही शेतकी अभ्यासकांच्या माहितीनुसार कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ झाली होती. यावर्षी देखील मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ होईल, असा आंदाज त्यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये कापसाचे दर घसरले आहेत. क्विंटलमागे दोन हजार रुपयांहून अधिकची घट झाली आहे. मात्र, लवकरच कापसाच्या दरात वाढ होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचं अभ्यासकांनी म्हटलंय.

बाजारात अजूनही कापसाच्या दरात घसरण असल्याचे जाणकारांनी सांगितलं आहे. गेल्या वर्षी मार्च-एप्रिलपर्यंत कापसाचे दर वाढले होते. यंदाही मार्च-एप्रिलमध्येच कापसाचे भाव वाढण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. शेतकरीही मार्च-एप्रिलपर्यंत वाट पाहत आहेत. कापसाच्या भावात प्रतिक्विंटल 11 हजार रुपयांहून अधिक वाढ होऊ शकते, असे शेतकऱ्यांचं देखील म्हणणं आहे. सध्या 7 हजार 500 ते 8 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकला जात आहे. येत्या काही दिवसांत कापसाची मागणी वाढल्यास त्याचे दरही सुधारतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे कापसाचा भाव वाढून मिळावा ही शेतकऱ्यांची अशा पुर्ण होणार का ते पाहावं लागणार आहे.

Prakash Harale: