अश्विन-अय्यर-सुर्या चमकणार? कांगारुंना पहिला धक्का; शमीने कांडी फिरवली

मोहाली : (IND vs AUS 1st ODI) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मोहाली येथे सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार केएल राहुल याने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गोलंदाजीसाठी आलेल्या कांगारूंना शमीने पहिला धक्का दिला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाचा आघाडीचा फलंदाज मिचेल मार्श चार चेंडूत चार धावा करून बाद झाला. चार धावांवर कांगारूंना पहिला धक्का दिला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कांडी फिरवली अन् मिचेल मार्शला पव्हेलियनचा रस्ता दाखला आहे.

टीम इंडियामध्ये श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांना स्थान दिलेय. त्याशिवाय वॉशिंगटन सुंदरऐवजी आर. अश्विनला संधी दिली आहे.

भारताची प्लेईंग ११ –

शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, विकटकीपर), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी,

Prakash Harale: