हिटमॅन शर्मा इन! ‘या’ फ्लाॅप खेळाडू आऊट; अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11

विशाखापट्टनम : (Ind vs Aus 2nd ODI Playing-11) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना रविवार दि. 19 रोजी विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून शानदार विजय मिळविला. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी आहे.

दरम्यान, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापुर्वी सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेइंग-11 वर असणार आहेत. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या वनडेसाठी संघात सामील होणार आहे. पहिल्या सामन्यात कौटुंबिक कारणांमुळे तो खेळू शकला नाही, त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने संघाची धुरा सांभाळली होती. रोहितच्या पुनरागमनामुळे प्लेइंग-11 मधून कोणता खेळाडू बाहेर पडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सूर्यकुमार यादव किंवा ईशान किशन या दोघांना दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग-11 मधून बाहेर बसावे लागेल असे दिसते. सूर्या बाहेर बसण्याची अधिक शक्यता आहे कारण तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सतत फ्लॉप राहिला आहे. असं असलं तरी इशान किशन मधल्या फळीतही फलंदाजीत माहिर आहे आणि त्याने काही महिन्यांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकही झळकावले होते.

संभाव्य प्लेइंग-11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

Prakash Harale: