नवी दिल्ली : (IND vs AUS 2nd Test 2nd Day) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या दिल्लीतील कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या दिवशी 263 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 81 धावांची खेळी केली. त्याचवेळी पीटर हँड्सकॉम्बने नाबाद 72 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याला योग्य साथ देत रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने 3-3 विकेट घेतल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा 21 धावांवर शून्य बाद अशी स्थिती होती.
भारताला पहिला धक्का 46 धावांवर बसला आहे. केएल राहुल 41 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. नॅथन लायनने त्याला पायचीत केले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा 69 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. नॅथन लायनने त्याला क्लीन बोल्ड केले. 54 धावांवर भारताची तिसरी विकेट पडली आहे. चेतेश्वर पुजाराला आपल्या 100 व्या कसोटीतील पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही. नॅथन लायनने एकाच षटकात दोन विकेट घेत टीम इंडियाला बॅकफूटवर आणले आहे. भारताला 66 धावांच्या स्कोअरवर चौथा धक्का बसला आहे. श्रेयस अय्यरने 15 चेंडूत चार धावा केल्या. नॅथन लियॉनच्या फिरकीत अडकल्याने टीम इंडिया अडचणीत आली आहे. 27 षटकांनंतर भारताची धावसंख्या 4 बाद 67 अशी होती.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा संपेपर्यंत 88 धावांवर 4 बाद अशी भारतीय संघाची व्यवस्था आली होती. विराट कोहली 30 तर रवींद्र जडेजा 25 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्कोअरपेक्षा भारत अजूनही 145 धावांनी मागे आहे. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लिऑनने चारही विकेट घेतल्या आहेत.
या सामन्यात आपली पकड मजबूत करण्यासाठी भारताला मोठी भागीदारी आवश्यक आहे. दिल्ली कसोटीत दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्राचा खेळ आटोपला आहे.