Ind vs Aus T-20 2nd Match : उद्या खेळला जाणारा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना यांच्यात खेळला जाणार आहे. जामठा स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार असून ऑस्ट्रेलियाने मोहालीचा पहिला सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही लढत एक प्रकारे ‘करो या मरो’ अशीच राहणार आहे.
दरम्यान, त्याआधीच नागपुरातून एक वाईट बातमी आल्यामुळे टिम इंडीयासाठी ही मालिका धोक्यात येण्याची शक्यता आहे. नागपुरात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे टीम इंडियाचे सराव सत्र रद्द करावे लागले. गुरुवारी सामन्याच्या दिवशी देखील पाऊस पडणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दरम्यान, सध्या आहे असेच वातावरण राहिल्यास दुसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मोहाली टी-20 मध्ये टीम इंडियाने 208 धावा करूनही सामना गमावला. ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स राखून सामना जिंकला. आता नागपूर टी-20 रद्द झाल्यास टीम इंडियाला हैदराबाद मधील तीसरा टी-20 सामना जिंकून ही मधील मालिका वाचवावी लागणार आहे. गोलंदाजांना आपली कामगिरी दाखवाली लागणार आहे.