टीम इंडियाने ‘या’ गेम प्लॉनमुळे बांगलादेशाला फॉलोऑन दिला नाही?

चितगाव : (IND Vs BAN Test Match 3rd Day 2022) भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने घेतलेल्या ५ विकेटच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात बांगलादेशचा १५० धावांवर ऑलाआउट केला. भारताने पहिल्या डावात ४०४ धावा केल्या होत्या. भारताकडून मोहम्मद सिराजने ३ तर उमेश यादव आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली. त्यामुळे बांगलादेशाचा पहिला डाव लककरच सावरला गेला.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशने ८ बाद १३३ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना फक्त १७ धावांची भर टाकता आली. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी नववी आणि दहावी विकेट घेतली. भारताने पहिल्या डावात २५४ धावांची आघाडी घेऊ देखील फॉलोऑन का दिला नाही. असा सवाल केला जात आह, मात्र भारतीय संघाचा नवा गेन प्लाॅन असल्यामुळे देण्यात आला नसावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पहिल्या कसोटीचा आज दिसरा दिवस आहे. अशाच बांगलादेशला फॉलोऑन दिल्यास ते दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करून भारताला दबावात आणू शकतील. कारण खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम आहे आणि धावा देखील निघू शकतील. अशा परिस्थितीत अखेरच्या डावात भारतावर दबाव येऊ शकतो. बराच काळ शिल्लक असल्यामुळेच भारताला मोठी आघाडी घेऊन बांगलादेशला कमबॅकची संधीच द्यायची नाही. त्यामुळे भारतीय संघाने सावध भुमिका घेत बांगलादेशाला फाॅलोआॅन दिला नाही अशी शक्यता आहे.

Prakash Harale: