ऑकलंड : (IND Vs NZ ODI Series 1st Match 2022) पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने भारताचे 306 धावांचे आव्हान 47 व्या षटकातच पार करत मालिकेत 1 – 0 अशी आघाडी घेतली. सामना झाल्यानंतर कर्णधार शिखर धवन म्हणाला की, ‘आम्हाला वाटले की आम्ही चांगल्या धावा केल्या होत्या, गोलंदाजीत आज आम्ही टॉम लॅथमला खूप शॉर्ट बॉल टाकले तेथेच त्याने आमच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. विशेष म्हणजे शार्दुल ठाकूरने टाकेल्या 40 व्या लॅथमने हल्ला चढवला आणि तिथेच सामना आमच्या हातून खेचला. याचवेळी सामन्याचे चित्र पालटले.
शिखर धवन ज्या 40 व्या षटकाबद्दल बोलतोय ते षटक शार्दुल ठाकूरने टाकले होते. या षटकात टॉम लॅथमने शार्दुलला 25 धावा चोपल्या (वाईडच्या 2 धावा) होत्या. यात एक षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. ज्यावेळी 40 वे षटक सुरू झाले त्यावेळी लॅथम 77 धावांवर खेळत होता. ज्यावेळी शार्दुलचे षटक संपले त्यावेळी लॅथमने 100 धावा पूर्ण केल्या होत्या.
शिखर धवनपुढे म्हणाला की, ‘न्यूझीलंडमध्ये खेळताना खूप चांगले वाटते. जर आम्ही सामना जिंकला असता तर अधिक आनंद झाला असता. मात्र हा खेळाचाच एक भाग आहे. संघात अनेक युवा खेळाडू आहेत त्यांच्यासाठी या सामन्यातून खूप काही शिकरण्यासारखे आहे. गोलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये आम्हाला अजून सुधारणा करण्याची गरज आहे. याचबरोबर फलंदाजाला त्याच्या क्षमतेनुसार खेळ करण्याची मुभा देऊ नये.’