विजयादशमीआधी विजयपंचमी! अखेर न्युझीलंडला पाणी पाजलं! भारताचे सेमीफायनल टिकीट पक्क

धर्मशाला : (IND vs NZ World Cup 2023) धरमशालाच्या मैदानावर भारताने न्यूझीलंडचा विजयरथ रोखला आहे. भारताने न्यूझीलंडचा चार विकेटने पराभव करत विश्वचषकात सलग पाचव्या विजयाची नोंद केली आहे. या विजयासह भारताने गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.

विराट कोहलीच्या 95 धावांच्या बळावर भारताने न्यूझीलंडचा चार विकेटने पराभव केला. न्यूझीलंडने दिलेल्या 274 धावांचे आव्हान भारताने सहा विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.

विराट कोहलीने 95, रोहित शर्माने 46, श्रेयस अय्यरने 33 आणि रविंद्र जाडेजाने नाबाद 39 धावांचे योगदान दिले. यंदाच्या विश्वचषकातील भारताचा हा सलग पाचवा विजय होय. त्यामुळे विजयादशमीआधी विजयपंचमी झाली आहे. शिवाय न्यूझीलंडचा विजयरथ भारताने थांबवला तर आहे हा मागील वीस वर्षानंतर झालेला विश्वचषकातील पराभव आहे.

आता गुणतालिकेत भारताने अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. या विजयासह भारताने सेमीफायनलमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.

 

Prakash Harale: