ईशान-हार्दिकने लाज राखली! टॅप आर्डर तंबूत परतल्यानंतरही भारताच्या 200 पार धावा..

IND vs PAK Asia Cup 2023 : कर्णधार रोहित शर्मा आणि रनमशीन विराट कोहली लवकर तंबूत परतल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. आघाडीचे चार फलंदाज झटपट तंबूत परतल्यामुळे भारतीय संघ संकटात सापडला होता. त्याचवेळी इशान किशन आणि हार्दिक पांड्या भारताचासाठी संकटमोचक म्हणून आले. दोघांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी करत भारताच्या धावसंख्येला आकार दिला. त्यानंतर चौकार आणि षटकार मारत धावसंख्या वाढवली. इशान किशन याने आधी अर्धशतक ठोकले, त्यापाठोपाठ हार्दिक पांड्यानेही अर्धशतक ठोकले.

हार्दिक पांड्या आणि इशान किशन यांनी पाचव्या विकेटसाठी 100 धावांची भागिदारी करत भारताची लाज राखली. भारताने 66 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या आघाडीच्या चार फलंदाजांचा समावेश होता. या चारही फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. पण पाचव्या विकेटसाठी इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी जबरदस्त भागिदारी केली. हार्दिक पांड्याने 62 चेंडूत अर्धशतक ठोकले तर इशान किशन 54 चेंडूत अर्धशतक ठोकले.

इशान किशन याने शतकाकडे वाटचाल केली आहे. इशान किशन सध्या 81 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 82 धावांवर बाद झाला आहे. तर हार्दिक पांड्या सध्या तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 66 धावांवर खेळत आहे.

आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि इशान किशन यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. पाचव्या विकेटसाठी हार्दिक आणि इशान किशन यांच्यामध्ये शतकी भागिदारी झाली आहे. कठीण स्थितीत या दोघांनी भारताची धावसंख्या वाढवण्याचे काम केले. त्यामुळे मधल्या फळीने भारताची लाज राखल्याचे बोललं जात आहे.

Prakash Harale: