IND vs PAK : “…तर पंतप्रधान नरेंद्र मोदी गायब होतील”; जावेद मियाँदादने पंतप्रधानांबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य

IND vs PAK : भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) मध्ये सध्या वाद सुरु आहे. या वादाच कारण म्हणजे, आशिया कप 2023 टुर्नामेंट. BCCI आशिया कप 2023 स्पर्धेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. बहरीनमध्ये आशियाई क्रिकेट काऊन्सिलची बैठक झाली. या बैठकीत बीसीसीआयने आशिया कप 2023 स्पर्धा खेळण्यासाठी अजिबात पाकिस्तानात येणार नाही, अशी भूमिका बीसीसीआयने स्पष्ट केली. यातून या सगळ्या वादाची सुरुवात झालीय. पीसीबीच्या अध्यक्षांसह त्या देशातील क्रिकेटर्स भारताबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादने (Javed Miandad) पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल (Narendra Modi) वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

आशिया कप 2023 स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. पण बीसीसीआयने टीम इंडिया पाकिस्तानात येणार नाही, असं सांगितलय. याबाबतचा निर्णय पुढच्या महिन्यात होईल. क्रिकेटमध्ये बीसीसीआयची आर्थिक ताकत मोठी आहे त्यामुळे बीसीसीआयच्या भूमिकेपुढे आपलं काही चालणार नाही, याची पाकिस्तानला पुरेपूर कल्पना आहे. त्यामुळे पाकिस्तानला भारताचा निर्णय मान्य करावा लागेल. याच मानसिकतेतून पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वादग्रस्त वक्तव्य करतायत.

जावेद मियाँदादने काय वक्तव्य केले?

भारत पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच खेळायला घाबरतो, असा जावेद मियाँदादचा स्वत:चा तर्क आहे. “भारत पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅचमध्ये हरला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी गायब होतील. जनता मोदींना सोडणार नाही” असं मियाँदाद म्हणाला. “पाकिस्ताकडून पराभव होत असल्याने भारताने शारजाहच्या मैदानातून पळ काढला होता. पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर भारतीय टीमच्या अडचणी वाढतात. तिथल्या मोठ्या खेळाडून नुकसान सोसाव लागतं” असं मियाँदाद म्हणाला.

Dnyaneshwar: