नवी दिल्ली | IND vs SA T20 Series – भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकणार आहे. जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाल्यानं तो विश्वचषकाला मुकणार आहे. पीटीआयनं बीसीसीआयमधील सुत्रांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे. या घोषणेनंतर अवघ्या 24 तासांच्या आत बुमराहच्या जागी सध्या सुरु असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये कोणत्या खेळाडूला संघात स्थान देण्यात येणार यासंदर्भातील माहिती ‘बीसीसीआय’ने दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी सराव करताना जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली, ज्यामुळं संघ व्यवस्थापनानं बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतींशी झुंजणाऱ्या जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी-20 मालिकेतून संघात पुनरागमन केलं होतं. जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाल्यानं तो विश्वचषकाला मुकणार आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) संघात स्थान देण्यात आलं आहे. ‘बीसीसीआय’नं यासंदर्भातील घोषणा केल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
दरम्यान ‘‘बुमरा विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्याच्या पाठीची दुखापत गंभीर आहे. या दुखापतीमुळे त्याला जवळपास सहा महिने मैदानाबाहेर राहावे लागू शकेल,’’ असं ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे. परंतु ‘बीसीसीआय’ने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.