Ind vs Wi Series 2023 : भारत सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. यावेळी 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 12 जुलैपासून सुरू होत आहे. इंडिजच्या या दौऱ्यावर टीम इंडियाला आपल्या एका खेळाडूची नक्की उणीव भासेल.
टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची वनडे आणि टी-20 कारकीर्द कसोटीनंतर संपणार असून आता या क्रिकेटपटूकडे निवृत्तीचाच पर्याय उरला आहे. भुवनेश्वर कुमारने टीम इंडियासाठी शेवटचा वनडे 21 जानेवारी 2022 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. याशिवाय भुवनेश्वर कुमारने टीम इंडियासाठी शेवटचा टी-20 सामना 22 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.
2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात त्याच्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर भुवनेश्वर कुमार ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला होता, पण त्यानंतर त्याची कसोटी कारकीर्द जवळपास संपुष्टात आली होती. कारण यानंतर भुवनेश्वर कुमारला भारताच्या कसोटी संघात संधी मिळाली नाही.