पंतप्रधान मोदी डोळ्यासमोर निवडणूका ठेऊन अर्थसंकल्प सादर करत नाही – रावसाहेब दानवे

India Budget 2023 | देशाचा अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात झाली आहे. या अर्थसंकल्पावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Ravsaheb Danave) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी अर्थसंकल्पाबाबतच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) डोळ्यासमोर निवडणूका ठेऊन अर्थसंकल्प सादर करत नाही. माझं सरकार हे गरीबांसाठी समर्पित असेल. गरिब कल्याणाचा अजेंडा कायम आमच्या डोळ्यासमोर असतो. हाच गरीब कल्याणाचा ध्यास डोळ्यासमोर ठेवूनच हा अर्थसंकल्प सादर केला जाईल, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.

या अर्थसंकल्पाच्या पेटीत काय निघणार? काय महागणार आणि काय स्वस्त होणार त्याचप्रमाणे हे अर्थसंकल्प करदात्यांची चिंता वाढवणार की त्यांना दिलासा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Dnyaneshwar: