भारत-कॅनडातील तणाव वाढला; अमेरिकेनं भारताला विशेष सवलत देणार नसल्याचा घेतला पवित्रा

India Vs Canada | कॅनडानं (Canada) खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येचा आरोप भारतावर (India) केला आहे. तसंच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय दलालांचा हात असण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे सध्या भारत आणि कॅनडातील तणाव चांगलाच वाढला आहे. यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेके सुलिव्हन यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भारताला विशेष सवलत देणार नसल्याचं सांगितलं.

जेके सुलिव्हन यांनी सांगितलं की, अमेरिका भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांच्या संपर्कात आहे. तसंच अमेरिका आणि कॅनडा यांच्यामध्ये मतभेद असल्याचं मी नाकारतो. कॅनडानं केलेल्या आरोपांबाबत आम्ही चिंतित आहोत. हा तपास पुढे जावा आणि गुन्हेगारांना पकडलं जावं, अशी आमची इच्छा आहे.

कॅनडामध्ये झालेल्या एका खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येबद्दल कॅनडानं दावा केला होता. या दाव्यानंतर अमेरिकेचे काही अधिकारी भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. तसंच या प्रकरणी अमेरिकेचं सरकार भारताला कोणतीही विशेष सवलत देत नाही, असंही जेके सुलिव्हन यांनी सांगितलं.

Sumitra nalawade: